फेटा बांधून घेणे किंवा बांधने ही फक्त पुरुषांची मक्तेदारीची क्षेत्रे आता उरलेली नाहीत, या क्षेत्रात महिलाही दिमाखदारपणे सहभागी होऊ लागल्या आहेत. शिवाजी नगरच्या कांचन शहापुरकर याचेच उदाहरण आहेत. बेळगावातल्या अनेक उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी फेटे बांधले आहेत. या कामाला सुरुवात केल्यापासून त्यांनी एक लाखाहून अधिक जणांना फेटे बांधले आहेत. गणेश आगमना दिवशी सकाळी ते रात्री पर्यंत हजारो युवक कार्यकर्त्यांना मानाचे फेटे बांधले आहेत.
कांचन यांचे वय आहे वय ३२. त्यांचे शिक्षण १० वी पर्यंत मराठी माध्यमात झाले आहे. मराठी संस्कृतीची आवड ७ ते ८ वर्षांपासून लागली. दुर्गामाता दौड ला जात होते तिथे बांधून घेणारे जास्त आणि बांधणारे कमी म्हणून मग आपण बांधायला लागले. त्यानंतर बेळगावातील पाहिलं मानाचं जगदंबा ढोल पथकाची सदस्य झाले आत्ता पर्यंत अनेक ढोल शिकवायचे काम जोरात सुरू आहे. प्राथमिक शाळेत जाऊन लहान मुलांना लाठी आणि तलवार बाजींचे शिक्षण देते. विविध मंदिरांची सेवा म्हणून फेटे बांधायचे काम करते. असे तीन बेळगाव live शी बोलताना सांगितलंय.
फेटे बांधण्यासाठी लग्न व इतर कामवेळी पैसे घेते पण सामाजिक काम, गणेशोत्सव, दौड अशा कामात पैशांची अपेक्षा ठेवत नाही.माजी मुख्यमंत्री बी एस येदूरप्पा आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देखील अनेकदा मानाचा फेटा बांधला आहे तर पंत प्रधान नरेंद्र मोदी यांना फेटा बांधायची संधी थोडक्यात हुकली आहे.समाज आणि संस्कृतीच्या कार्यात फेट्याला अनन्यसाधारण महत्व आहे.हे महत्व राखून ठेवण्यासाठी कायम प्रयत्न करेन असे त्या म्हणाल्या.
संपर्क कांचन शहापुरकर,शिवाजी नगर बेळगाव 09900558605