दिवसभर गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत होत असताना सगळीकडे आनंदी वातावरण असताना दुसरीकडे ज्योतीनगर कंग्राळी येथे पाणी भरत असताना शॉक लागून एका महिलेचा मृत्यु झाला आहे.शालन यल्लाप्पा धामणेकर ( वय 42 ) असे मयत झालेल्या महिलेचं नाव आहे.ए पी एम सी पोलिसांनी बेळगाव live ला दिलेल्या माहीती नुसार शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास शालन यांच्या घरातील सर्वजण गणपती आणायला गेले असता पिण्याच्या पाण्याच्या टाकीमधील पाणी भरून बटन बंद करतेवेळी विजेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. मयत शालन यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.
Less than 1 min.
Previous article
Next article