खरीप हगांमात परिसरातील बहुतांश शेतकरी मुख्य पिक भात घेतो आणी पावसावरच त्याची मदार असते मात्र यावर्षी शेतकऱ्यांना प्रथम दर्शनी पावसाने चांगली साथ दिली तशी जोमात भातासह सर्व पीक बहरल्याने शेतकरी आनंदीत होता पण त्याचा आनंद निसर्गाला पहावला नाही अशीच परिस्थिती आली झाली आहे.
पावसाने बरेच दिवस हुलकावणी देत दडीच मारली त्यामुळे बहरलेली पीक उन्हाच्या तडाख्याने वाळू लागली आहेत.अलिकडेच कर्नाटक शासनाने कृत्रिम पाऊस पाडणार म्हणून आश्वाशनही दिल पण अजूनही त्याचा पत्ता नसल्याने शेतकरी मोठ्या विवंचनेत अडकला आहे. कारण 2015 सालीसुध्दा हिच परिस्थिती आली आणी त्यावेळी खरीप,रब्बी दोन्हीही पीक गेली तुटपूंजी मदत मिळाली होती. त्यात गेल्यावर्षी रब्बी पिकावर विमा उतरवला व प्रत्यक्ष पिकाजवळ जाऊन कृषी अधिकारी पंचनामा करुन आलेतरी अजून भरपाई मिळालेली नाही त्यातच हे दुसर पावसाने दडी मारलेल संकट शेतकरी कुटुंबावर ओढवल आहे.
कांही शेतकरी शेजारील शेतकऱ्यांनी कुपनलीका खोदली असेल त्याच्याकडून आपल्या वाळत चाललेल्या भातात पाणी सोडून जगवण्याचा प्रयत्न करताहेत पण त्याची शाश्वती नाही त्यात विजेचा शेतकऱ्यांना तुटवडा भासत आहे. थोडी जमीन भिजते न भिजते तोवर विज गायब अशा गंभीर परिस्थितीतून शेतकरी जात आहे पण शासन कोणतही असो शेतकऱ्यांना झुलवत ठेवणे येवढच राज्यकर्ते करत आहेत. शेतकऱ्यां साठी कोणताही ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सुखी करण्याची सद्बुद्दी मात्र यांना सुचत नाही.असो कर्नाटक शासनाने बेळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यच दुष्काळग्रस्त जाहिर करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी नियोजन केलेले कोट्यावधी रुपये खर्चून प्रयत्न करावा जेनेकरुन अत्यल्प तरी पाऊस मिळेल अथवा पुढच्या रब्बी पिकासाठी तरी उपयोग होईल अन्यथा शासन शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य करायच मात्र त्याच शेतकऱ्याला कंगाल यांनीच करायच हे अधोरेखीत झाल्याशिवाय रहाणार नाही.बातमी सौजन्य -राजू मर्व्हे वडगांव