सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक डॉ राजन गवस(गारगोटी) यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रुपये रोख मानचिन्ह प्रशस्ती पत्रक असे आहे.
रविवारी 13 आगष्ट 2017 रोजी सायंकाळी 5:30 वाजता मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
पानीपत कार विश्वास पाटील मुंबई, अरुण साधू मुंबई,डॉ जयसिंहराव पवार कोल्हापूर,उत्तम कांबळे नाशिक, कृष्णा मेणसे बेळगाव,सदानंद मोरे पुणे,मधु मंगेश कर्णिक मुंबई, सतीश काळसेकर मुंबई,कुमार केतकर मुंबई,विष्णू वाघ गोवा,आ ह साळुंखे सातारा,रावसाहेब कसबे नाशिक यांना देण्यात आला आहे