बेळगावहून उत्तरेकडे प्रवास करू इच्छिणारे नागरिक आणि विशेषतः लष्करी अधिकारी व जवानांना सोयीची ठरावी अशी बेळगाव ते जम्मू म्हणजेच उधमपूर रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे. याकामी कॅन्टोन्मेंट चे सदस्य आणि अध्यक्ष असलेले ब्रिगेडियर यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सिटीझन कोन्सिल च्या माध्यमातून करण्यात आली.
कोन्सिल चे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी आपल्या सर्व सदस्यांसह ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांची भेट घेऊन ही मागणी केली.
सध्या उपलब्ध रेल्वेन्नी फक्त दिल्ली पर्यंतचा प्रवास सुरु आहे. त्यापुढील प्रवासासाठी नवी रेल्वे व्हावी.पुणे, रतलाम, आग्रा, नवी दिल्ली, पानिपत, अंबाला, पठाणकोट, जालंधर व जम्मू या मार्गांचा समावेश असावा, तरच लष्कर, वायुदल चे जवानांची सोय होईल असे निवेदन दिले आहे. बेळगाव संरक्षण खात्याचा महत्वाचं बेस असल्याने अनेकदा दिल्लीतून पुढे जाण्यासाठी लष्करी जवानांची गैरसोय होत असते त्यामुळे पुणे रतलाम आग्रा, नवी दिल्ली, पानिपत, अंबाला, पठाणकोट, जालंधर व जम्मू उधमपूर या लष्करी केंद्र असलेल्या मार्गावरून नवीन रेल्वे सुरू करावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
तेंडुलकर, बसवराज जवळी, शेवंतीलाल शहा,अनिल कुलकर्णी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य साजिद शेख, मदन डोंगरे विक्रम पुरोहित हे उपस्थित होते. लवकरच कॅटोंमेंट बोर्ड हुबळी ते उधमपूर जम्मू अशी डायरेक्ट रेल्वे सुरू करा असा ठराव करणार असून संरक्षण खात्या द्वारा रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.





