कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टातील काल झालेल्या सुनावणी चे पडसाद महाराष्ट्राच्या विधी मंडळात उमटले असून विधान सभेत कॉंग्रेस आमदार नितेश राणे विरोधी पक्ष नेते राधा कृष्ण विखे पाटील तर विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले ,नारायण राणे आणि धनंजय मुंढे यांनी मुद्दा उपस्थित करून राज्य सरकार ला धारेवर धरले.शिवसेना खासदार आमदार गप्प का ? नितेश राणे
कर्नाटका कडून सुप्रीम कोर्टात वकिलांची फौज उभेत असते मात्र महाराष्ट्र कडून या खटल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत विधान सभेत शिव सेनेचे आमदार गप्प का असा प्रश्न कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला तर राधा कृष्ण विखे पाटील यांनी देखील बेळगाव प्रश्नी केंद्र मराठी जणावर होणारे अन्याय रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय असा आरोप केला . यावेळी मंगळवारी सायंकाळी राज्य सरकार कडून या प्रश्नी आपली भूमिका मांडली जाणार असल्याच विधान सभा अध्यक्षांनी स्पष्ट केल.
महाराष्ट्राचे खासदार गप्प का ? धनंजय मुंढे
राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले यांनी सुरुवातीला बेळगाव प्रश्न उपस्थित केल्या नंतर राष्ट्रवादीचे गट नेते धनंजय मुंढे यांनी बेळगाव केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतंय आणि महाराष्ट्राचे ४८ खासदार गप्प का आहे राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपचे सरकार असतेवेळी अनास्थेची भावना का असा प्रश्न उपस्थित केला या नंतर कॉंग्रेस आमदार नारायण राणे यांनी राज्य सरकारला धारेवर धरल बेळगाव प्रश्नी सुप्रीम कोर्टात इतक्या मोठ्या घटना घडतात मात्र महाराष्ट्र सरकार कडे यावर चर्चा करायला वेळ नाही हे दुर्दैवी आहे अशी टीका करत या विषयावर वेगळी चर्चा करा अशी मागणी त्यांनी सभा पतीकडे केली .
उद्या परिषदेत विशेष चर्चा
यावर उत्तर देंताना समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सुप्रीम कोर्टात या प्रश्नावर जेष्ठ विधीतज्ञ हरीश साळवे यांच्याशी आमची चर्चा केली आहे ते कोर्टात उपस्थित राहणार आहेत राज्य सरकार च याकडे बारकाई ने लक्ष आहे .या खटल्यात महाराष्ट्राची बाजू सक्षम आहे अस म्हणत या विषयी चर्चा करण्यासाठी उद्या विशेष वेळ दिला जाईल असा आश्वासन दिल.
आदरणीय नारायण राणे साहेब तसेच मा.नितेश राणे साहेब तसेच विधानपरिशधेचे विरोधी पक्ष नेते मा धनंजय मुंडे साहेब, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सीमाप्रश्नी चर्चेत भाग घेतलेले मा हेमंत टकले व इतर मान्यवरांनी विधानसभा व विधानपरिशदेत सीमाभागातील जनतेच्या भावना,अत्याचार जाणून आवाज उठवून वाचा फोडल्याबद्दल सर्वांचे शतशः ऋणी आहोत.