Wednesday, December 25, 2024

/

भाजपच्या मेडिकल कॅम्पमधूनच ‘स्वच्छ भारत’ला खो..

 belgaum

आगामी विधान सभा निवडणुकीसाठी उत्तर मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून घेतलेल्या एका उमेदवाराच्या कार्यक्रमात स्वच्छ भारत योजनेचा फज्जा उडाला आहे.Bjp cleanness care
आपणाला उमेदवारी मिळावी म्हणून अनेक ठिकाणी मेडिकल कॅम्प लावलेल्या पेशाने डॉक्टर असलेल्या या इच्छुकांच्या वतीने चिक्कबस्ती येथे आयोजित रक्त दान मेडिकल शिबिरात स्वच्छतेची ऐसी की तैसी झाली आहे.ब्लड चेक केलेल्या सुई,कापूस ग्लास आणि इतर वैध्यकीय साहित्याचा कचरा कार्यक्रम स्थळीच पडला होता.

Bjp clean 2वास्तविक रित्या मेडिकल कॅम्प आयोजकांनी सर्व मेडिकल साहित्य कचरा स्वच्छ करावा लागतो त्याची योग्य विल्हेवाट लावावी लागते मात्र आयोजकांनी तो तिथंच टाकून पोबारा केल्याची घटना घडली आहे. चिकबस्ती एक पुरातन ऐतिहासिक वास्तू आहे मात्र अश्या ठिकाणी स्वच्छता न ठेवणे म्हणजे निव्वळ राजकीय स्वार्थ आहे.

मला तिकीट तुला तिकीट म्हणणारे असे अनेज जण उत्तर विधानसभा मतदार संघात भाजप कडून अनेक जण इच्छुक आहेत मात्र या सगळ्यांकडे नैतिकतेची कमतरता आहे हे यावरून दिसुन येत आहे.स्वतःला पार्टी विथ दि डिफ्रन्स म्हणवून घेणारे असे का हा प्रश्न विचारला जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.