बुधवारी होणाऱ्या ऐतिहासिक अश्या मराठा क्रांती मोर्चा साठी बेळगाव आणि खानापूर परिसरातून चार हजार हुन अधिक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.टवेरा, ट्रक्स,कार सह अनेक जण गावागावातून गटागटाने मुंबई गाठत आहेत.
मंगळवारी सायंकाळी सकल मराठा समाजाच्या कार्यालयातून तीन बस आणि खाजगी वाहनाने शेकडो कार्यकर्ते रवाना झाले आहेत.गेल्या दोन दिवसांपासुन शहर उपनगर आणि खेडो पाड्यातील कार्यकर्ते गटा गटाने खाजगी वाहनाने रेल्वे तसंच बस च्या सहाय्याने या अगोदरच मुंबई कडे रवाना झाले आहेत शेकडो जणांनी मुंबई गाठली आहेत अनेक जण वाटेवर आहेत.
मुंबईतील ऐतिहासिक मराठा मोर्चात बेळगाव सीमा प्रश्न सोडवा ही आग्रही मागणी सामील केल्याने अनेक उत्साही कार्यकर्ते मोर्चात सामील झाले आहेत.मुंबई मोर्चात बेळगाव सीमा प्रश्नी जनजागृती करून पत्रक वाटप करण्यात येणार आहेत तर फलक दाखवत सीमा भागातील मराठी भाषकांचे मागणी पुढं करणार आहेत.