बेळगाव शहरात हेल्मेट सक्ती करण्यात येत असताना कॅटोंमेंट लिमिट्स मध्ये हेल्मेट सक्तीची अंमल बजावणी होत नव्हती खास करून ऑफिसर मेस भागात याकडे दुर्लक्ष होत होते.
मागील कॅटोंमेंट बोर्डाच्या बैठकीत नूतन ब्रेगेडियर गोविंद कलवाड यांनी मिलिटरी पोलिसांना कॅटोंमेंट भागात हेल्मेट सक्ती करून बेळगाव ट्राफिक पोलिसांना सहकार्य करा अश्या सूचना दिल्या होत्या.
छावणी सीमा परिषद भागात देखील प्रत्येकाने हेल्मेट परिधान करावं हा उद्देश्य समोर ठेऊन ही सूचना करण्यात येत आहे असं देखील स्पष्ट केलंय.
बुधवारी कॅम्प येथील ऑफिसर मेस भागात हेल्मेट न घालणाऱ्या 50 वाहन चालका ना दंड करण्यात आला आहे. दंड घालतेवेळी ट्रॅफिक पोलिसां सह मिलिटरी पोलीस देखील हजर होते. सी एम पी(कॉप्स ऑफ मिलिटरी पोलीस) हे भारतीय सैन्य दलाचे पोलीस आहेत युद्धातील कैद्यांची हँडल करण्यासाठी आणि ट्रॅफिक सांभाळण्यासाठी मिलिटरी पोलीस चा वापर केला जातो.