बेळगावात गणेश उत्सवाच्या बंदोबस्ताच्या तयारी ची पहाणी करण्यासाठी बेळगावला आलेल्या अतिरिक्त पोलीस महा संचालक (कायदा आणि सुव्यवस्था) कमल पंत यांनी गुरुवारी ट्रॅफिक नियंत्रण केंद्रास भेट दिली आहे.
रहदारी नियंत्रणा साठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कश्या पद्धतीनं ट्रॅफिक नियंत्रित करतात शहरात कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठी याचा कसा उपयोग होतो याचा कसा वापर केला जातो याची त्यांनी माहिती जाणून घेतली
बेळगावात गणेश उत्सव बंदोबस्ता साठी सगळे उपाय योजना करण्यात आल्या असून कायदा
आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्यात आली आहेत कोणतीच अनुचित घटना घडल्यास योग्य ती कारवाई करण्यास बेळगाव पोलीस सक्षम आहेत परिस्थिती वर नजर ठेऊन आहोत अशी माहिती ए डी जी पी कमल पंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
शहरात बसवण्यात आलेली सीसीटीव्ही व्यवस्था चांगली आहे अस देखील ते म्हणाले.
बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील पोलीस अधिकाऱ्यांची बंदीबस्त आढावा बैठक त्यांनी घेतली आणि बंदोबस्ता बद्दल मार्गदर्शन केलं