बेळगाव शहराची सुरुवात चव्हाट गल्ली तर मध्य भाग भांदुर गल्ली आहे हे सगळे मराठी संस्कृती टिकवणारे बालेकिलेले अबाधित राहिले पाहिजे अस मत मराठा समाजाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले आहे.
भांदुर गल्ली सार्वजनीक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित गणेश महोत्सवाच उदघाटन केल्यावर ते बोलत होते.या कार्यक्रमास प्रमुख उद्योजक म्हणून शंकरराव पाटील उपस्थित होते.यावेळी राजेंद्र मुतगेकर,महादेव चौगुले,महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा मुतगेकर आदी उपस्थित होते.
मरगाळे यांनी भांदुर गल्लीतील गणेश भक्तांनी ह्या वर्षी सीमाप्रश्न सुटू देत अस गणपती कडे साकडे घाला म्हणून आवाहन केल त्यावेळी त्याला उपस्थित कार्यकर्त्यानी टाळ्यांचा गजरात साथ दिली.