बेळगाव शहरात आज खुशी आणि उत्साहाचा माहोल आहे. प्रत्येकाच्या घरात गणराय आले आणि विघ्नहर्त्या बाप्पाचे स्वागत करण्यात सारे बेळगाववासी रंगून गेले आहेत.
गुरुवारी रात्रीपासूनच भक्तांनी बाप्पांचे स्वागत सुरू केले. आज सकाळी सगळेजण बाप्पांच्या आगमनाच्या घाईत होते. मूर्तिकारांकडे मोठी लगबग सुरू होती आणि वाजत गाजत व फटाके वाजवत बाप्पाला घरोघरी आणले जात होते.
प्रत्येक गल्लीत आरती , फटाके आणि नैवेध्य चालला होता, दुपारी नंतर सगळ्यांनीच सार्वजनिक मूर्ती आणून प्रतिष्ठापना करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
आता रात्री उशिरा पर्यंत सार्वजनिक मंडपात बाप्पांचे आगमन झाले आहे
Trending Now