बेळगाव तालुक्यात या वर्षी कमी पाऊस पडला असल्याने शेतीतील सर्व पिकं येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं बेळगाव तालुक्याला दुष्काळ ग्रस्त जाहीर करा अशी मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. यावर्षी कमी पावसाने भात पीक खराब झालं असून शेतकरी आर्थिक स्थितीत अडकला आहे त्यामुळे सरकार कडून नुकसान आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांना सातबारा वर नो क्रॉप नोंद रद्द करावी, बेळळारी नाल्या वरील अतिक्रमण रोखावी तसंच 8 तास थ्री फेस विद्युत पुरवठा करावा अश्या देखील मागण्या निवेदनात केल्या आहेत.
तालुका समितीचे अध्यक्ष निंगोजी हुद्दार,माजी मनोहर किणेकर,एस एल चौगुले,जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील,अर्जुन गोरल,राजू पावले, महेश जुवेकर रावजी पाटील, वामन पाटील,शांता राम कुगजी राजू मरवे आदी उपस्थित होते.आजचा तालुका समितीतील मोर्चात ग्रामीण पेक्षा दक्षिण मतदार संघातील कार्यकर्ते अधिक होते.