लिंगायत समाजाला वेगळा धर्माचा दर्जा ध्या या मागणी साठी उध्या मंगळवारी बेळगावात होणाऱ्या मोर्चात दोन लाखाहून अधिक राज्य आणि देशातील लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.नागनुर रुद्राक्षी मठाचे स्वामीजी डॉ सिद्धराम स्वामीजी यांच्या नेतृत्वात हा लिंगायत समाजाचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र सह देशातील विविध भागातून मोठ्या संख्येने लिंगायत समाजातील लोक सहभागी होणार आहेत.यावेळी लिंगराज कॉलेज ग्राउंड वर भव्य मेळावा होणार आहे यावेळी केंद्र सरकारकडे लिंगायत समाजाला वेगळा धर्म करा अशी मागणी केली जाणार आहे.
खालील प्रकारे बेळगावातील ट्रॅफिक व्यवस्था असणार आहे
सकाळी 9 पासून ट्रॅफिक बदल लागू केलं असून कॉलेज रोड संभाजी चौक किर्लोस्कर रोड हुतात्मा चौक मारुती गल्ली गणपत गल्ली काकातीवेस आणि खडे बाजार नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.
लिंगायत मोर्चा संपे पर्यंत या सगळ्या वरील रोड वर ट्रॅफिक बंद केलो जाणार आहे.
या काळात ट्रॅफिक व्हाया कॅम्प ग्लोब सर्कल,कोल्हापूर क्रॉस रायन्ना सर्कल अस वळवल जाणार आहे.
मोर्चात येणाऱ्या लोकांनी खालील ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्लोब जवळील पोस्ट ऑफिस, मराठी विध्या निकेतन स्कुल, बेनन स्मिथ कॉलेज, सी पी एड, हिंडलगा गणपती,धर्मनाथ भवन,बाळेकुंद्री कॉलेज, शिव बसव नगर खुलो जागा