बेळगाव रेल्वे स्थानका पासून ते तिसऱ्या रेल्वे गेट चाट्रॅक सुसाईड पॉईंट ठरत आहे. सोमवारी सकाळी 11 ते 2 च्या दरम्यान अवघ्या तीन तासात या रेल्वे ट्रॅक वर दोघांनी रेल्वे खाली झोकुन आत्महत्त्या केली आहे.शेवटच्या श्रावण सोमवार निमित्य असलेली सोमवती अमावस्या सुसाईड डे ठरली आहे.
सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास तिसऱ्या रेल्वे गेटाजवळ जवळपास 52 वर्षाच्या इसमाने तर दुपारी दीड च्या सुमारास अरुण थिएटर समोर अंदाजे 25 ते 28 वयाच्या महिलेने रेल्वेखाली झोकुन आत्महत्या केली आहे.घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी पंचनामा केला असून मयतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.