Wednesday, November 20, 2024

/

किरण सायनकांची पैलवानास दहा हजारांची मदत -live इम्पॅक्ट

 belgaum

पुढील महिन्यात तुर्कस्थान येथे होणाऱ्या आशिया कुस्ती चॅम्पियन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुचंडी गावचा आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू अतुल शिरोळे यास जेष्ठ नगरसेवक किरण सायनाक यांनी दहा हजार रुपयांची मदत दिली आहे.
अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत या अगोदर अतुल शिरोळे याने कुस्तीत यश मिळवलं आहे.तुर्कस्थान येथे होणाऱ्या एशियन कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याला 1 लाख 40 हजार रुपयांची गरज आहे. आर पी डी कॉलजमध्ये शिकणाऱ्या या पैलवनाची संघर्ष गाथा बेळगाव live ने सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजा समोर मांडली होती या अनुसार माजी महापौर किरण सायनाक यांनी अतुल शिरोळे यास 10 हजारांची मदत दिली आहे.

महापालिकेत महापौर संज्योत बांदेकर यांनी शिरोळे यास 10 हजारांचा चेक दिला.अतुल अजून मदतीची गरज असून समाजाने अश्या गरीब खेळाडूस मदत करण्याची गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.