एकीकडे बेळगाव भागात यावर्षी पाऊस कमी पडला असताना दुसरीकडे खोल च्या खोल खड्डा मारून सुरु असलेले बांधकाम आणि त्यासाठी केलेली खुदाई बेकायदेशीर आहे अशी माहिती पालिका बैठकीत समोर आली आहे. सराफ गल्ली हरमा इन्फ्रा या कंपनीच्या वतीने इमारत बांधण्यात येंत असून बेस मेंट साठी जवळपास २५ ते ३० फुटांचा खड्डा काढण्यात आला आहे. नियम नुसार २.७५ मीटर खड्डा खणून इमारत बांधण्यासाठी अर्ज देणे आणि दुसरीकडे ३० फुट खड्डा मारून खुदाई करणे असा प्रकार सराफ गल्लीत घडला आहे.
गुरुवारी झालेल्या पालिका बैठकीत नगरसेवक राजू बिर्जे यांनी सराफ गल्लीतील बांधकामास परवानगी दिली आहे का? इमारत बांधकामाची खुदाई नियम किती असतो अशी माहिती विचारता अभियंता आर एस नाईक यांनी सराफ गल्लीतील बांधकामास अजून अधिकृत परवानगी दिली नाही तर नियमानुसार केवळ १० फुट पर्यंत खुदाई करू शकतो अशी माहिती दिली.
यावेळी राजू बिर्जे यांनी या खड्यातून दररोज दोन मीटर लाऊन 5 हुन टँकर अधिक पाणी उपसा करण्यात येत आहे. या पाणी उपसा मुळे शाहपूर भागातील सर्व बोरवेल आणि विहिरींचे पाणी लवकर आटण्याची शक्यता आहे असंही स्पष्ट केल. तर पालिका सब डिविजन मधून मुख्य कार्यालया पर्यंत फाईल आलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी किरण सायनाक यांनी केली .
बेळगाव पालिकेतील अधिकारी आणि नगरसेवक यांच्या अजिबात समन्वयाचा अभाव आहे यामुळे अधिकारी सैराट झाले आहेत महापौर आणि आयुक्तांनी बैठक घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांना वठणीवर आणावे अशी मागणी विरोधी पक्ष नेता दीपक जमखंडी यांनी केली.