तीन खून आणि एक आत्महत्त्येच्या घटने नंतर ब्लॅक मंगळवार झाल्या नंतर काही तासातच आणखी एका युवकाने आत्महत्त्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.
दोडडणावर कॉम्प्लेक्स जवळील फुलबाग गल्लीतील प्रतीक प्रल्हाद नाईक वय 19 वर्ष या युवकाने गळफास लाऊन घेऊन आत्महत्त्या केली आहे.
मार्केट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीक हा गुन्हेगारी स्वरूपाचा युवक होता ए पी एम सी पोलिसात एका प्रकरणात त्याला जेल ची हवा खायला लागली होती दोन दिवसापूर्वी त्याची जामिनावर मुक्तता झाली होती.
या वरून त्याला घरच्या कुटुंबियांनी ताकीद केली होती . मंगळवारी रात्री घरच्या सोबत भांडण झालं होतं यानंतर जेवण करून झोपायला गेल्यावर रात्री बेड रूम मध्येच गळफास लावून आत्महत्त्या केली आहे.
बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून मार्केट पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.