Thursday, April 25, 2024

/

बीम्स कर्मचारी स्टाफ नर्सची आत्महत्त्या तर चिकोडी जवळ शिरोळच्या पोलीस पुत्राचा खून

 belgaum

chikodi murderबेळगाव शहराला आत्महत्त्या आणि खुनाचे ग्रहण लागले आहे कि काय असच म्हणावं लागेल मंगळवारी सकाळी फुलबाग गल्लीतील युवकाने आत्महत्त्या केल्या नंतर स्टाफ नर्स ने देखील गळफास लावून आत्महत्त्या आणि चिकोडी तालुक्यातील हणबरवाडी येथे कोल्हापूर येथील पोलीस पुत्राचा अपघात भावून खून केल्याची घटना देखील उघडकीस आली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बीम्स मध्ये काम करणाऱ्या राजेश्री केसर गोपंप हिने श्रीनगर येथील राहत्या घरात पंख्याला गळा आवळून घेऊन गळफास लावून आत्महत्त्या केली आहे . मी स्वतःच्या मर्जीने आत्महत्त्या करत असून यास कोणालाही जबाबदार धरू नये अशी चिट्टी लिहून ठेऊन तिने गळफास लावून घेतला असल्याची माहिती पोलिसांनी दिली . दोन वर्षा पूर्वी राजेश्रीचा विवाह झाला होता तिला एक लहान मुलगी आहे . माल मारुती पोलिसांनी घटना स्थळी पहिली केली या प्रकरणी माळी मारुती पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे .

निप्पाणी जवळ पोलीस पुत्राचा खून
चिकोडी तालुक्यातील निपाणी जवळील हणबरवाड़ी मधे शिरोळ पोलीस स्थानकाचे पोलिस शब्बीर बोजगार यांच्या पुत्राचा खून करण्यात आला आहे
शाहरुख भोजगार असं त्याच नाव असून याचा तीक्ष्ण हत्यारने भोसकून खून केला आहे शब्बीर बोजगार हे कोल्हापूरच्या शिरोळ मधील पोलिस कॉन्स्टेबल असून खुनाचे कारण अस्पष्टआहे निपाणी ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत खून करून अपघात झाल्याचा भासवन्याचा प्रयत्न झाला सल्याचे देखील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.