मूळचे केरळ येथील असले तरी बेळगावात शिक्षण घेतलेले के के वेणूगोपालच देशाचे atorni general झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुक्रवारी रात्री त्यांच्या नियुक्तीला संमती दिली आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी देखील वेणूगोपाल यांच्या नावाची घोषणा केली आहे.हा अंदाज बेळगाव live ने सात दिवसांपूर्वीच व्यक्त केला होता आणि तो खरा ठरत आहे. सध्या या पदावर असलेले मुकुल रोहतगी यांच्या कार्यकालाचा अवधी १९ जून रोजी संपत असल्याने देशातील अनेक जेष्ठ वकील कायदे घटनात्मक तज्ञाची नावे अटर्नी जनरल पदाच्या शर्यतीत होती.सध्याचे देशाचे सॉलीसीटर जनरल रणजीत कुमार आणि आंतरराष्ट्रीय विधी तज्ञ हरीश साळवे या दोघांची नावे प्रामुख्याने चर्चेत होती. त्यातच जेष्ठ वकील के के वेणुगोपाल यांच नाव देखील अटर्नी जनरल पदाच्या शर्यतीत आलं होतं, आणि त्यांनाच यश मिळणार असून ते या पदावर रूढ होणार आहेत.
वेणुगोपाल यांनी राजा लखनगौडा लॉ कॉलेजमध्ये कायद्याची डिग्री पूर्ण केली आहे .१९५४ मध्ये त्यांनी आपली वकिली सुरु केली होती तर १९७२ मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात वकील म्हणून कार्य सुरु केलय .
पॉंडीचेरी विधानसभा स्पीकर निवडणूक केस,१९७६ मध्ये करुणानिधी मंत्री बरखास्ती केस ,बाबरी मस्जिद केस,घटनेत अनेक नवीन तरतुदी करणाऱ्या केस सह अनेक हाय प्रोफाईल महत्वाच्या केस लढल्या आहेत.पद्म विभूषण,पद्मभूषण पुरस्कार प्राप्त देशात अधिक फीज घेणारे वकील म्हणून त्यांच्याकडे बघितल जातंय एका केस हजेरीला ते ५ ते १५ लाखा पर्यंत फीज घेत असतात.
सध्याचे सॉलीसीटर जनरल रणजीत सिंह हे एका पदावर आहेत तर जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे यांनी या अगोदर माजी पंतप्रधान मन मोहन सिंह यांच्या काळात अटर्नी जनरल पद भोगले आहे यामुळे ते सध्या इच्छुक नाहीत त्यामुळे बेळगावचे विध्यार्थी असलेल्या वेणुगोपाल के के यांच्या गळ्यातच अटर्नी जनरल पदाची माळ पडली आहे.