एखाद्या गोष्टीचा कंटाळा येणे, मानसिक थकवा जाणवणे, एकाच पध्दतीच्या कामाचा उबग येणे थोडक्यात बोअर होणे म्हणजे निरूत्साही होणे अशा अवस्थेतून प्रत्येक व्यक्ती कधीना कधी जरी जातच असते.
किती लोक आपण करीत असलेल्या नोकरी व्यवसायातून आनंद मिळवतात? आपल्या आजूबाजूला पाहिले तर या प्रश्नाचे उत्तर शोधायला सुध्दा भीती वाटते. आजकाल प्रत्येकजण पैशाच्या मागे धावतो आहे. हा पैसा बर्याच वेळेला खोटं बोलायला, नाटकी वागायला भाग पाडत असतो. वरिष्ठांसमोर हांजी हांजी करायला लावतो. लाचारी पत्कारायला लावतो, मनाला मुरड घालावयला शिकवतो. खोटं हसायला लावतो. मग मन नाराज होतं. शरीरात सगळी नकारात्मक रसायनं फिरायला लागतात. शास्त्रज्ञांनी असं सिध्द केलं आहे की जी व्यक्ती आनंदाने, प्रेमाने, नेटाने आपलं काम करते त्या व्यक्तीची मनोशारीरिक स्थिती उत्तम राहून आरोग्य चांगले राहते.
या उलट आपल्या कामाबद्दल कर्तव्याबद्द उदासीन लोक किंवा नुसते पाट्या टाकणारे लोक जास्त आजारी पडतात. कारण या व्यक्तींना काम चांगले व व्यवस्थित केल्याचे समाधान म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाही.
आपले काम आपल्या आवडीचे असेल तर ते व्यवस्थित पूर्ण होणारच. एखाद्या चांगल्या लेखकाला कारकुनी करायला लावली तर? असो. हा बर्याच वादाचा मुद्दा आहे. पण प्रत्येकालाच आपल्या आवडीचे काम मिळत नाही. तडजोड करावी लागते. त्यांनी काय करायचं? ज्यांना सारखा आळस येतो, काम आवडत नाही, वेळेचे बंधन पाळता येत नाही. अशा व्यक्तींसाठी पुष्पौषधी व होमिाओपॅथी ही व्दयी अक्षरशः देवदूतासारखी काम करते.
विनिताने कॉम्प्युटर इंजिनियरिंगमध्ये पदवी मिळवली होती. तिच्या मनात बेंगलोरला जाऊन जॉब मिळवायचा होता. पण घरच्यांना विरोध असल्यामुळे तो बेत रहित करावा लागला. लग्न जमेपर्यंत आपल्या शहरातच मिळेल त्या नोकरीवर समाधान मानावे लागले. अर्थातच पगार खूप कमी होता. करायची म्हणून नोकरी चालली होती. हळुहळु तिला सगळ्यातच निरूत्साह वाटायला लागला. तिला नोकरीचा कंटाळा आला आणि ती गैरहजर राहू लागली. वरिष्ठांनी गैरहजर राहण्याची कारणे विराल्यावर न पटणारी उत्तरे मिळत असत. तिचे बॉस तिच्या वडिलांचे मित्रच होते. सकाळी जॉबला जाण्याचा विचार जरी मनात आला तरी आकाश कोसळल्यासारखे वाटत असे. बिचान्यातच लोळत पडणे, उगाचच टाईमपास करणे असा वेळा घालावायची विनिताला सवयच पडून गेली.
तिच्या वडिलांच्या लक्षात हा सगळा प्रकार आला. ते विनिताला पुष्पौषधीची ट्रीटमेंट घेण्यासाठी घेऊन आले. सगळी परिस्थिती लक्षात घेऊन तिला विशिष्ट औषधं चालू केल्यावर बराच फरक पडला. नंतर विनिता उत्साहाने काम करू लागली. परंतु कामाविषयी असा प्रॉब्लेम हाता की तिच्या आवडीचे काम तिला बेंगलोरमध्येच मिळणार होते, त्याविषयी तिने वडिलांना असा मुद्दा सांगितला की एक तर तिच्यासाठी वर शोधताना तो इंजिनिअरच असावा आणि त्याने विनिताला नोकरीसाठी परवानगी द्यावी. वडिलांनीही ही अट मान्य केली. आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव म्हणा विनिताला तसा नवरा मिळालाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येतच असतात, पण योग्य संधी येईपर्यंत फक्त माशा मारत बसू नये. तडजोड करत टप्याटप्याने यश मिळवावे. त्यामुळे यशाची गोडी चाखता येते. व प्रयत्न केल्याचे समाधानही मिळते.
इतर वेळी पुष्पौषधी व होमिओपॅथी आहेतच आपल्या मदतीला.
डाॅ.सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक ०८३१-२४३१३६२
सरनोबत क्लिनिक ०८३१-२४३१३६४
Mumbai मध्ये आपली शाखा आहे का?
असेल तर कृपया पत्ता देणे