दोन दुचाकींची आमोरा समोर टक्कर झाल्याने डॉक्टर सह दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव राकसकोप रोडवर बेनकनहळळी जवळ मंगळवारी सायंकाळी घडली आहे.
चंद्रकांत जम्बु बिंदगे वय 60 वर्ष रा.बेळगुंदी आणि विनायक यल्लप्पा पाटील वय 24 रा मच्छे अशी अपघातात ठार झालेल्या दोघा दुचाकी स्वारांची नावे आहेत.बेळगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार चंद्रकांत बिंदगे हे पेशाने डॉक्टर आहेत मंगळवारी सायंकाळी ते आपल्या कायनेटिक होंडा गाडी वरून बेळगाव हुन बेळगुंदी कडे जात होते तर विनायक पाटील हा युवक बेळगुंदी कडून बेळगाव कडे येत असतेवेळी घरकुल जवळ हा अपघात झाला आहे.
अति वेगाने गाडी चालवणाऱ्या विनायकच आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने विरुद्ध दिशेहून बेळगुंदी कडे येणाऱ्या डॉक्टर च्या कायनेटिक ला जोराची धडक दिली यात विनायक ची दुचाकी 100 फूट फरफटत गेली आहे दोन्ही गाडी चक्काचूर झाल्या असून घटनास्थळी दोघांचा मृत्यू झाला आहे.बेळगाव ग्रामीण पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे