विश्वेश्वरय्या तांत्रिक विध्यापीठाने बीई सिव्हिल आणि मेकॅनिकल शाखांचे आठव्या सेमिस्टर चे निकाल २२ जुलै ला जाहीर केले. उर्वरित शाखांचे निकाल ३१ जुलै च्या पूर्वी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. जुन व जुलै २०१७ मध्ये या परीक्षा झाल्या होत्या.
यंदा निकाल लागण्यास उशीर झाल्याने १९० संलग्न कॉलेजचे ६०००० विध्यार्थी अडचणीत आले आहेत. पुढील शिक्षण परदेशात घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था वाईट आहे.निकलापूर्वीच ज्यांना वेगवेगळ्या कम्पनीत नोकऱ्या मिळाल्या तेही प्रमाणपत्र नसल्याने हजर होऊ शकत नाहीत.
व्हिटीयूचे मूल्यमापन विभाग रजिस्ट्रार सतीश अनिगेरी यांनी उर्वरित निकाल ३१ जुलै रोजी आणि जास्तच उशीर झाला तर ७ ऑगस्ट पर्यंत लावू असे सांगितले आहे.