Saturday, January 4, 2025

/

अख्ख कुटुंबच सर्प मित्र

 belgaum

केवळ सर्प हे नाव घेतलं तर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते मनात भीती निर्माण होते मात्र सर्पांना न घाबरता त्यांना वाचविण्याचा विडा उचलुन प्रयत्नशील असणारा युवक म्हणजे आनंद चिट्टी..साप हा शेतकऱ्याचा शत्रू नसून मित्र आहे हे पटवून देण्याच काम ते करत आलेले आहेत म्हणूनच त्यांच्या या योगदाना बद्दल ते बेळगाव live चे आठवडयाच व्यक्तिमत्व ठरले आहेत.Chittiबेळगाव तालुक्यातील येळ्ळूर सारख्या छोट्याश्या खेड्यात जन्मलेल्या  या मध्यमवर्गीय कुटुंबातील युवकाने सर्पांना वाचवून समाजात सर्पांबद्दल चुकीची समजूत दूर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. २००२ पासून गेली १५ वर्ष सतत सर्प जन जागृती चे अभियान हाती घेऊन ते हे कार्य करत आहेत बेळगाव परिसरात कुणालाही साप दिसला कि त्यांना पटकन फोन येतो मग त्या स्थळी जातात साप पकडतात अन त्यां सापांना जंगलात सोडन जीवनदान देण्याचं  कार्य चालूच असतंय.  साप पकडण्यासाठी २४ तास त्यांची सेवा उपलब्ध असते.

आनंद चिट्टी यांनी मागील १५ वर्षात १३६२३ सर्पांना जीवनदान दिलय तर सरपं विषयी समाजातील गैर समजुती दूर करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यात ६६९ व्याख्याने दिली आहेत. उत्तर कर्नाटकात राज्य सरकार कडून सर्प पकडून त्यांना जीवनदान देण्याचे अधिकृत असे एकमेव सर्प मित्र आहेत .आता पर्यंत १३ वेळा घरघुती वातावरणात सर्पांच्या अंड्यातून पिल्ले तयार करण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला आहे. सर्प पकडण्याचे अनेक प्रसंग त्यांच्या  जीवावर बेतले असून त्यांना तब्बल २० वेळा सर्प दंश झाला आहे त्यातून वाचून त्यांनी अविरतपणे हे कार्य सुरु ठेवले आहे.

Chitti familyकेवळ आपणच नाही तर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ही त्यांनी सर्प पकडण्याच प्रशिक्षण दिल असून त्यांच्या पत्नी निर्झरा चिट्टी या देखील महिला सर्प मित्र आहेत निर्झरा यांनी देखील आता पर्यंत ७०० हून अधिक सापांना जीवनदान दिल आहे त्या देखील कर्नाटकातील एकमेव महिला सर्प मित्र आहेत या शिवाय त्यांची दोन लहान मुल देखील न घाबरता सर्प पकडतात. ’सर्प परिचय’ ‘सर्प मानवी गैरसमजुतीच्या विळख्यात’ आणि ‘फिर भी डर लगता है’ अशी तीन सर्पा वर आधारित पुस्तक आनंद यांनी लिहिली असून लवकरच ती प्रकाशनाच्या मार्गावर आहेत .

बेळगाव सह कर्नाटक महाराष्ट्रातील अनेक नामांकित संस्था कडून आनंद यांना पुरस्कार मिळाले असून अनेकांनी त्यांची दखल घेतली आहे. आमंत्रित म्हणून वन विभागाकडून आयोजित विध्यार्थ्यांना सर्प बद्दल व्याख्याने देत असतात, अंधश्रद्धा निर्मुलन ,भ्रष्टाचार निर्मुलन,व्यसन मुक्ती ,राष्ट्रभक्ती अस्य अनेक संस्था साते कार्यरत आहेत . अश्या या सर्प मित्राच्या कार्यास बेळगाव live कडून मन पूर्वक शुभेच्छा …

संपर्क आनंद चिट्टी

०९९०१४७६४८४

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.