सदाशिवनगर स्मशानभूमीतील गळती असलेले पत्रे आठ दिवसात बदला शेडची दुरुस्ती करा अन्यथा शिवसेना आंदोलन करून शेड दुरुस्ती करील असा इशारा सेनेच्या वतीनं देण्यात आला आहे.
शिवसेनेच्या वतीनं शहर अभियंत्याना निवेदन देऊन शेड दुरुस्ती हाती घ्या अस निवेदन सादर केलं आहे.सदाशिवनगर स्मशान भूमीत शेड वरील पत्र्यात गळत्या असून जनतेला याचा त्रास होत आहे असे देखील नमूद करण्यात आले आहे.महा पालिके ने सदाशिवनगर स्मशान कडे दुर्लक्ष केलं आहे.
सदर शेड चे पत्रे दुरुस्त करा अशी बातमी बेळगाव live ने देखील प्रसिद्ध केली होती याची दखल घेत शिवसेने ने पालिकेस निवेदन दिले आहे.यावेळी शिव सेनेचे प्रकाश शिरोळकर, बंडू केरवाडकर,सचिन गोरले,प्रकाश राऊत,दिलीप बैलूरकर प्रवीण तेजम आदी उपस्थित होते