एकीकडे सोशील मीडियाचा पॉजिटिव्ह वापर होत असताना दुसरीकडे व्हाट्स अप्प आणि फेस बुक वरील येणाऱ्या संदेशांच्या भडिमारामूळ अनेक जण कंटाळत आहेत. बेळगावात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या एकट्याने श्रावण महिना पूर्ण पणे, फेस बुक आणि व्हाट्स अप्प न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया पासून दूर राहून वेगळ्या पद्धतीनं श्रावण महिना पाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
मदन बामणे अस त्यांचं नाव असून ते जायनट्स, जत्ती मठ कृती समिती या संस्था आणि महाराष्ट्र एकीकरण समितीत सक्रिय आहेत.
हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जातो त्यामुळं या महिन्यात मांसाहारी पदार्थ आणि दारू वर्ज्य करण्यात येते असते त्यातच या सगळ्या बरोबर त्यांनी या महिन्यात सोशल मीडिया वर्ज करणार असल्याने त्यांचं वेगळपण दिसत आहे. टी व्ही पाहणे ,फोन चा वापर तसच सोशल मीडिया वापर याचा वापर दैनंदिन कामकाज बनलं आहे मात्र एक महिना देखील यापासून दूर राहणे म्हणजे सामान्य माणसाला कठीण असते मात्र गेल्या वर्षी पासून मदन बामणे असं वेगळ पण जपत आहेत.