एक दिवस बेळगावसाठी या उपक्रमा अंतर्गत शहरातील अनेक ठिकाणी विविध संस्थांच्या सहकार्याने पंधरा हजारहून अधिक रोपे लावून हिरवे बेळगाव करण्याचा संकल्प सोडला.प्यास फौंडेशनच्या पुढाकाराने आणि वन खात्याच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. महानगरपालिकेच्या मोकळ्या जागा,शाळांच्या आवारात,सार्वजनिक उद्यानात,रस्त्यावरील दुभाजकावर, रस्त्याच्या कडेला अशा विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
महानगरपालिकेच्या चाळीस खुल्या जागांवर,उद्यानात आणि खुल्या जागात नागरिकांनी उत्साहाने वृक्षारोपण केले.सात आठ वर्षाच्या शाळकरी विद्यार्थयापासून सत्तर वर्षाच्या आजोबा पर्यंत अनेक शिक्षण सामाजिक संस्थांनी यात सहभाग घेतला होता वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झाले होते.
अनेक सामाजिक संस्था,संघटनांनी,लोकप्रतिनिधीनी, महिला मंडळांनी शहरातील वृक्षारोपणाच्या जागा निवडून वनखात्याकडून रोपे घेऊन वृक्षारोपण केले आणि त्या रोपाची पुढील दोन वर्षे देखभाल करण्याचा संकल्प सोडला.
केवळ वृक्षारोपण करून प्रदूषण रोखू शकत नाही तर या झाडांचा सांभाळ कारण देखील सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे झाडांचा सांभाळ करा असा आवाहन महापौर संज्योत बांदेकर यांनीनी केल .सकाळी संभाजी चौक आणि लक्ष्मी टेक मध्ये वृक्षारोपण करून महापौर संज्योत बांदेकर उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी या एक दिवसीय मोहिमेचे उद्घाटन केल . यावेळीखासदार प्रभाकर कोरे ,आमदार महांतेश कवटगीमठ माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहल्ली, नगरसेविका माया कडोलकर, प्यास फौंडेशन चे माधव प्रभू आदि उपस्थित होते.