खानापूर येथील प्रजावणी दैनिकाचे पत्रकार प्रसन्न कुलकर्णी यांना नंदगड पोलिस उपनिरीक्षक यु एस आवटी यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकास सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
सोमवरी दुपारी बेकवाड येथे कुलकर्णी यांना आवटी यांनी बेदम मारहाण केली होती या घटने नंतर खानापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी नंदगड पोलीस स्थानका समोर तब्बल चार तास धरणे आंदोलन करत पोलिसी वृत्तीचा निषेध केला होता याची दखल घेत अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रवींद्र गडादी यांनी पत्रकारांची भेट घेतली आणि आवटी यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले आहेत . आगामी दोन दिवसात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन देखील गडादी यांनी दिल आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख रविकांत गौडा बेळगाव बाहेर असल्याने ते आल्यावर आवटी यांच्या अन्यत्र बदलीचा आदेश निघणार आहे. नंदगड पी एस आय आवटी यांनी दंडुकेशहीचा वापर करत लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर घाला घातला आहे याचा सर्वत्र निषेध होत आहे.
खानापूर येथील पत्रकार प्रकाश देशपांडे,चेतन लक्केबैलकर,आपजी पाटील,पिराजी कुऱ्हाडे,सुहास पाटील, वासू चौगुले, राजू कुंभार, परशराम पालकर, जगदीश होसमनी कासीम हट्टीहोळी ,यल्लप्पा कोनेरी आदी पत्रकार उपस्थित होते.