बेळगाव सीमा प्रश्नाची सुनावणी अंतिम टप्प्यात सुरू असताना कर्नाटक सरकार भाषिक अल्प्ससंख्याक आयोगाच्या शिफारशी साठी लोकसभेत प्रयत्न करू अस ठोस आश्वासन शिवसेना खासदारांनी दिल आहे.
गेले तीन दिवस आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वात समिती नेत्यांचं शिष्टमंडळ नवी दिल्लीत तळ ठोकून आहे यावेळी सेना खासदारांच्या भेटी घेऊन चर्चा केली. सेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर,अरविंद सावंत,श्रीकांत शिंदे, राज्यसभा सदस्य संजय राऊत यांची भेट घेतली.
कर्नाटक सरकार कशी भाषिक अल्पसंख्यांक पायमल्ली करत आहे याची जाणीव समिती समितीच्या शिष्टमंडळाने करून दिली. सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टात प्रयत्न सुरू असताना कर्नाटक सरकारने कानडी वरवंटा फिरवत आहे महाराष्ट्रातील खासदारांनी एकत्रित येऊन संसदेत आवाज उठवावा अशी देखील समितीच्या नेत्यांनी केली .यावर सेने खासदार सीमा भागातील मराठी जनतेच्या पाठीशी राहतील अस अश्वांसन समिती नेत्यांना दिली. बेळगाव सीमा प्रश्नाची माहिती पुस्तिका देण्यात आली.लवकरच संजय राऊत करणार बेळगावचा दौरा
यावेळी सेना खासदार संजय राऊत यांनी बेळगाव लवकरच बेळगाव दौरा करणार असून नेमकं सीमा भागात मराठी जणांची कशी गळचेपी केली जाते हे जाणून घेणार आहेत. महा पालिकेत कन्नड नाड गीताची सक्ती, जिल्हाधिकारी एन जयराम यांचं मराठी विरोधी धोरण, सुप्रीम कोर्टात याचिके बद्दल या सगळी माहिती आपुलकीने जाणून घेतली.