वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया सुरू असल्याचा बेळगाव महा पालिकेचा दावा फोल ठरत असून गोवा वेस भागात खासगी हॉस्पिटल मधील मेडिकल गारबेज (कचरा) रस्त्यावर फेकला जात असल्याचा फोटो बेळगाव live कडे उपलब्ध झाला आहे.
शहर स्मार्ट करू अशी घोषणा करणाऱ्या ना अध्याप कचरा निवारण करणे जमले नसून स्मार्ट बेळगाव कस होणार याकडे लक्ष लागलं आहे.
खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कचरा प्रक्रिया करणे बंधणकारक आहे. पण काही रुग्णालय त्याची अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकारातून रोगराई पसरण्याची भीती आहे.गेले काही दिवस गोवावेस येथे हा प्रकार सतत घडतो आहे. येथे रस्त्याच्या कडेला कचरा फेकला जात आहे, अशी तक्रार येथील रहिवाशांनी केली असून याला अधिकाऱ्यांचा हलर्जीपणा कारणीभूत आहे.
नेहमी सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असणारे टिळकवाडी गोवा वेस भागातील नगरसेवकांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.