अजंठा फिल्म सोसायटी व लोकमान्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने “चित्रलोक” हा चित्रपट प्रदर्शनाचा कार्यक्रम अंगिकारण्यात आला आहे. प्रेक्षकांची अभिरुची वृद्धिंगत करण्याच्या हेतूने विविध भाषांमधील उत्तमोत्तम चित्रपट प्रदर्शित करणे व त्यावर चर्चा घडवून आणणे असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमातील पुढील गाजलेला चित्रपट “सायको” सोमवार दि. १० जुलै १७ रोजी सायंकाळी ६.०० वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपट आल्फ्रेड हिचकॉक यांनी दिग्दर्शित केला असून त्याला चार ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकित करण्यात आले होते.
हा कार्यक्रम फक्त चित्रलोकच्या सभासदांसाठी असून सध्या मर्यादित सभासद नोंदणी सुरु आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यास सभासद होऊ इच्छिणाऱ्यांनी लोकमान्य ग्रंथालय येथे संपर्क साधावा असे आवाहन अजंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष श्री. सय्यदभाई व लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्री. अशोक याळगी यांनी केले आहे.