बेळगावचे चेरापुंजी म्हणून ख्यात असलेलं जिल्ह्यात सर्वात अधिक पाऊस पडणार ठिकाण असलेलं खानापूर तालुक्यातील कुणकुंबी परिसराला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपले असून अति पावसाने माऊली मंदिरा जवळील चिगुळे रस्ता वाहून गेला आहे. या रस्त्यावरील छोटे ब्रिज या पावसाच्या जोराने खचल आहे. कुणकुंबी चिगुळे ह मार्ग बंद झाला आहे.
खानापूर तालुक्यात 377.5मी मी पाऊस झाला असून बेळगावात 143.3 मी मी .पाऊस झाला आहे.मंगळवारी सकाळीन पासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालो होती दिवसभर आणि रात्री एका पेक्षा एक मोठया पावसाच्या सरी पडतच होत्या.बेळगाव तालुक्यातील राकसकोप धरणाची देखील 1.20 फुटांनी पाणी पातळी वाढली आहे.
मंगाई देवी यात्रे निमित्य पाऊस
नेहमी वडगावची ग्राम देवता मंगाई देवी यात्रे दिवशी भरपूर पाऊस पडतो असा इतिहास आहे त्यातच शहरास मंगळवारी मुसळधार झोडपल्याने देवी पावली आणि यात्रेत पाऊस पडतो याची पुनरावृत्ती झाली आहे.