बेळगाव सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टात केंद्राने नेहमीच अन्यायाची भूमिका घेतली आहे अनेकदा केंद्राने महाराष्ट्र विरोधी प्रतिज्ञापत्र सादर केली इथून पुढं केंद्राने सुप्रीम कोर्टात पक्षपाती प्रतिज्ञा सादर करू नये अशी मागणी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांच्याकडे करण्यात आली आहे.
दिल्ली स्थित गृहराज्य मंत्र्यांच्या निवासस्थानी एकीकरण समिती आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने अहिर यांच्याशी सविस्तर चर्चा करून ही मागणी केली आहे. यावेळी अहिर यांना सीमा प्रश्नाची माहिती पुस्तिका देण्यात आली त्यानंतर अत्यंत साधक बाधक चर्चा करण्यात आली नुकताच दोन देशातील सीमा भाजप सरकारने बदलल्या आहेत तसं दोन्ही राज्यातून संयमाने सामंजस्य पणे या प्रश्नी तोडगा निघावा अशी भूमिका अहिर यांनी मांडली.
भाजप कोर कमिटीत उपस्थित करणार प्रश्न गेली कित्येक वर्षे आम्ही बेळगाव प्रश्न पहात असून भाजपची राष्ट्रीय कार्यकारणीत बेळगाव सीमा प्रश्न नक्कीच मांडू अस म्हणत तब्बल अर्धा तास हुन अधिक काळ माहिती पुस्तिका नकाशे आणि सीमा प्रश्नी माहिती समजावून घेतली.आगामी आगष्ट महिन्यात कोल्हापूर दौऱयावेळी बेळगावला भेट देण्याचा प्रयत्न करू अस देखील अहिर यांनी समिती नेत्यांना आश्वासन दिलं आहे.