बेळगाव सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टात आज दुपारी अडीच वाजता होणाऱ्या सुनावणी साठी जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे यांनी बैठक घेतली आहे.दिल्लीत साळवे यांच्या कार्यालयात ही बैठक झाली असून सर्व वकिलांनी दुपारच्या सुनावणी संदर्भात चर्चा करण्यात आली. कर्नाटकचे जेष्ठ वकील पी पी राव हे आजारी असल्याचे पत्र कर्नाटकाच्या वतीनं दिल गेलं असून आज सुनावणी होईल की नाही याबाबत साशंकता आहे. दुपारीच याबद्दल अधिकृत माहिती कळणार आहे.
सोमवारी दुपारी सुप्रीम कोर्टात त्रि सदस्यीय खंडपीठ न्या दीपक मिश्रा,न्या आर भानुमती ,न्या अशोक भूषण यांच्या समोर सुनावणी होणार आहे.
दिल्लीतील बैठकीचे फोटो बेळगाव live कडे उपलब्ध झाले असून आजच्या या महत्वपूर्ण खटल्याकडे बेळगाव live लक्ष ठेऊन आहे.सोमवारी सकाळी साळवे यांच्या झालेल्या बैठकीत वकील संतोष काकडे शिवाजी राव जाधव ,राजाभाऊ पाटील आमदार अरविंद पाटील,दीपक दळवी, अड अपराजिता सिंह उपस्थित होते.