बेळगाव सह सीमाभागातील मराठी विध्यार्थ्याना महाराष्ट्रात मेडिकल आणि इंजिनियरिंग शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यांना डॉमिसीयल सर्टिफिकेट देण्यासाठी सुरुवातीला अधिकाऱ्यांनी टाळाटाळ सुरु केली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी एन जयराम यांनी आपले हात झटकले आहेत त्यांनी तहसीलदारा कडून हे प्रमाण पत्र घ्या अशी भूमिका घेतल्याने महाराष्ट्रात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यांच स्वप्न भंगतय कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील शिक्षणासाठी तहसीलदारा बरोबर जिल्हाधिकाऱ्यानी सुध्दा डॉमिसल दाखला देणे गरजेचे असताना बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यानी आपल्या वरील जबाबदारी झटकत हा दाखला , तहसीलदारच्या कडून घेण्यात यावा असें लेखी उत्तर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पाठविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून उपलब्ध झालेली प्रत बेळगाव live कडे उपलब्ध आहे.
महाराष्ट्रात दर वर्षी बेळगावातील मराठी विध्यार्थ्यासाठी मेडिकल ८ तर इंजिनियरिंग साठी २० जागा कोटा आरक्षित असतो यासाठी अनेक विध्यार्थी अर्ज करत असतात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार या दोघा कडून या डॉमिसील प्रमाण पत्राची गरज असते मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून हे प्रमाण पत्र तहसीलदार कडून घेण्यात यावे असे पत्र देण्यात आले आहे . गेल्या दोन वर्षापूर्वी अस डॉमिसील सर्टिफिकेट जिल्हाधिकारी देत होते मात्र सध्या डॉमिसिल (बोर्डर एरिया) प्रमाण पत्र देण्यास देखील टाळाटाळ केली जात आहे . महराष्ट्रातील नेत्यांनी याकडे लक्ष ध्याव अशी मागणी केली जात आहे
सीमाभागात मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणसाठी प्रवेश मिळू नये यासाठीच जाणूनबुजून आडकाठी घातली का ? असा प्रश्न विध्यार्थ्या समोर पडला आहे त्यामुळे अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळ सीमाभागात संताप व्यक्त केला जात आहे. गेले कित्येक दिवस सुनील जाधव भागोजीराव पाटील. गोपाळ किल्लेकर , साजीद सय्यद, यासह महाराष्ट्र एकीकरणं समितीचे कार्यकर्ते प्रमाण पत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत .