दलितांना स्वाभिमानाने जगणे शिकवणाऱ्या बाबासाहेबांचा आदर्श सर्वांनी घेतला तरच दलित समाजाचा भल शक्य आहे असं मत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केलं आहे.
फक्त पुतळे उभे करून कोणत्याही समाजाचं भल होत नाही तर त्यांच्या आचार विचाराचं पालन होणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले.
पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पालिके समोरील स्मारकाचा दिमाखात उदघाटन करण्यात आलं.
घटनेचे शिल्पकार महामानवाच्या स्मारक उदघाटन सोहळ्यास सर्वच दिगगज नेतेआमदार नगरसेवक आणि दलित नेते भीम सैनिकांनी आवर्जून हजेरी लावली होती.कुमार गंधर्व रंग मंदिर सभागृह खचाखच्च भरलं होत. यावेळी आमदार संभाजी पाटील महापौर संज्योत बांदेकर,उपमहापौर नागेश मंडोळकर ,खासदार सुरेश अंगडी, आमदार गणेश हुक्केरी, महंटेश कवटगीमठ, संजय पाटील विवेकराव पाटील आदी उपस्थित होते.
अस आहे पालिकेसमोरील ऐतिहासिक बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक
महा पालिकेच्या वतीने तब्बल एक कोटी २५ लाख खर्चून हे स्मारक उभारण्यात आला असून दक्षिण भारतात सर्वात उंच असा १७ फुटी बाबासाहेबांचा पुतळा या स्मारकावर बसविला आहे .
बापट गल्लीतील ख्यात मूर्तिकार संजय किल्लेकर यांनी हा पुतळा साकारला आहे. १९३९ साली स्वत बाबासाहेबांनी जुन्या महा पालिकेच्या कार्यालयाला भेट दिली होती त्यामुळे बेळगाव महा पालिका आणि बाबासाहेब आंबेडकर याचं वेगळ नात आहे . नवीन पालिकेच्या कार्यालयात जुन्या पालिकेची इमारतीची खास प्रतिकृती मॉडेल बनवून बाबासाहेबांची आठवण म्हणून ठेवण्यात आली आहे.
महाड या ऐतिहासिक चवदार तळ असलेल्या ठिकाणी जन्मलेल्या महापौर संज्योत बांदेकर यांच्या कारकिर्दीत हे स्मारक उदघाटन झाल्याने बाबासाहेब आणि बेळगाव च एक वेगळं नात आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय.