छत्तीसगडचे वनमंत्री महेश गडद यांनी बेळगाव जवळील सुतगट्टी गावातील शेताला भेट देऊन सेंद्रिय शेती आणि होमा फार्मिंगची माहिती घेतली.यावेळी कृषितज्ञ अभय मुतालिक देसाई यांनी अग्निहोत्राचे प्रात्यक्षिक दाखवले.अग्निहोत्रामुळे शेतातील कीड,रोगावर नियंत्रण ठेवता येते.
शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होतो आणि शेतकरी स्वावलंबी होतो याचे उदाहरण दिले.आपल्या शेतात छत्तीसगडच्या पन्नासहून अधिक शेतकऱ्यांना फिरवून माहिती दिली.,छत्तीसगडच्या मंत्र्यांनी आपल्या राज्यात अग्निहोत्राचा प्रचार करणार असल्याचे सांगितले.शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून त्याला स्वावलंबी बनविण्यासाठी अग्निहोत्र उपयुक्त आहे असे मतही मंत्री महेश गडाद यांनी व्यक्त केले.