बेळगाव सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टातील याचिकेवर जुलै अखेरीस सुनावणी होणार असल्याची माहिती बेळगाव live कडे उपलब्ध झाली आहे. गेल्या मार्च १० तारखेला ही सुनावणी होणार होती मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती.
जुलै २४ ते २७ तारखे दरम्यान महत्वाच्या चार अंतरिम अर्जावर ही सुनावणी होणार आहे कर्नाटकच्या वतीने घालण्यात आलेला अंतरिम अर्ज क्रमांक १२ नुसार सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या कक्षेत येत नाही या वर सुनावणी होणार आहे . महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व सात साक्षीदारांची प्रतिज्ञा पत्र काम पूर्ण करण्यात आली असून जुलै १५ पर्यंत मुख्य विधीतज्ञ हरीश साळवे स्वदेशी येणार आहेत त्या नंतर सर्व जुनियर आणि सिनियर वकिलांची बैठक घेणार आहेत अशी देखील माहिती मिळाली आहे.
मागील सुनावणी वेळी त्रिसदस्यीय खंडपीठाणे महाराष्ट्राच्या बाजूने बाजू मांडणारे वकील हरीश साळवे यांना मुदतीनुसार युक्तिवाद करावा अशी सुचना केली होती त्यानुसार जुलै शेवटच्या आठवड्यात महत्वाच्या चार अंतरिम अर्जावर सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री घेणार खासदारांची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बेळगाव प्रश्नी केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांची बैठक बोलवण्याचे निश्चित केले आहे. जुलै शेवटच्या आठवड्यात दिल्लीत सर्व पक्षीय खासदारांची बैठक मुख्यमंत्री घेणार आहेत.