मराठा समाजाला समजुतीच्या चार गोष्टी सांगणे म्हणजे तो जातीवाद नव्हे असे मत जेष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंहराव पाटील यांनी व्यक्त केले ते शंकर राव पाटील लिखित मराठा सामाजिक बांधिलकी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात वक्ते म्हणून बोलत होते .
रविवारी सायंकाळी मराठा मंदिराच्या सभागृहात झालेल्या समारंभाच्या अध्यक्ष स्थानी कॉ कृष्णा मेणसे होते यावेळी व्यासपीठावर प्रा आनंद मेणसे,पुस्तकाचे लेखक शंकरराव पाटील, मराठा समाज सुधारणा मंडळ अध्यक्ष प्रकाश मरगाळे सचिव जी जी कानडीकर उपस्थित होते . प्रारंभी डॉ जयसिंह राव पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या नंतर पुस्तकाचे अनावरण झाले .
गेली सात आठ वर्षात मराठा समाजातील विवाह समारंभात वर वेळेवर न येणे,मुहूर्तावर विवाह न लावणे अश्या अनिष्ट पद्धती सुरु आहेत कोणीतरी पुढाकार घेऊन त्या थांबवल्या पाहिजेत. विवाह कार्यक्रम का केवळ दोन घराण्यांचा कार्यक्रम असतो त्यामुळे भरपूर लोकांना न बोलावता केवळ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत असे कार्यक्रम करावेत असे मार्गदर्शन केल. नव वधूला रुकवत म्हणून भेट वस्तू देताना पुस्तकांच कपाट ध्याव अस आवाहन देखील त्यांनी यावेळी केल.
यावेळी शंकर राव पाटील यांनी आपल पुस्तक लिहिण्या मागील उद्देश्य सांगून इतर जाती धर्मात ज्या संघटीत होऊन प्रार्थना किंवा इतर कार्यक्रम केले जातात त्याच प्रमाणे मराठा समाजातील नागरिकांनी सुधा संघटीत पणे कार्य् करावे. प्रा आनंद मेणसे यांनी प्रास्तविक प्रकाश मरगाळे यांनी स्वागत केल शिवराज पतील्सुत्र संचालन केल. यावेळी दीपक दळवी मालोजी अष्टेकर आणि सुभाष ओउलकर यांनी पुस्तका संदर्भात आपल मनोगत व्यक्त केल.
बातमी सौजन्य रवी नाईक