मतदार ओळखपत्रास आधार कार्ड लिंक करा अशी मागणी बेळगाव भाजपने केली आहे गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली.
बेळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक बोगस मतदार याद्या बनविल्या आहेत अनेक बोगस मतांची नोंदणी करण्यात आली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. निवडणूक काळात मॅन मनी आणि मसल चा वापर होऊ शकतो असा देखील भाजप नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजप नेते इरांना कडाडी,अनिल बेनके अशोक पुजारी शशिकांत नाईक शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी यात सहभाग दर्शविला होता.रायबाग कुडची गोकाक हुक्केरी या भागातील पिण्याची समस्या हिडकल धुपदाल डॅम मधून पाणी सोडून करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.