कोणतेही बेकायदेशीर काम जर का सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून तुम्ही कराल तर बेळगाव मध्ये त्याला मोकळं रानच असतंय हे काही अंशी सत्य होताना दिसत आहे विषय आहे बेळ्ळारी नाल्याचा .. सरकारी जमीन असलेल्या बेळळारी नाल्यावरील अतिक्रमणाचा…गेले कित्येक दिवस शेती बचाओ समिती चे शेतकरी अतिक्रमण थांबवा अशी मागणी करत आहे मात्र या ना त्या कारणांनी अधिकाऱ्यांनी या गोष्टी कडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे
गुरुवारी शेती बचाव समितीच्या वतीने पालिका अभियंत्या, महापौर आणि जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिल काहींनी हात झटकले तर काहींनी नेहमी प्रमाणे कारवाई करण्याच आश्वासन दिल. जिल्हाधिकारी एन जयराम यांनी हे प्रकरण तहसीलदार कडे वर्ग केल आहे मात्र तहसीलदार याकडे गांभीर्यान लक्ष देताना दिसत नाहीत. बळ्ळारी नाल्या जवळ महेंद्र धोंगडी हे सरकारी नाल्याच्या जमिनीत अतिक्रमण करून कंपाउंड बांधून भराव माती टाकत आहेत याची तक्रार शेतकऱ्यांनी चारवेळा पोलीस स्थानक दोन वेळा जिल्हाधिकारी आणि दोन वेळा पालिका अभियंत्या कडे केली आहे तरी देखील अध्याप कोणतीच कारवाई झाली नाही आहे.
( वरील फोटोत आपण पाहू शकता कश्या पद्धतीने बेकायदेशीर रित्या बेळ्ळारी नाल्यात अतिक्रमण होत आहे )
महा पालिका अभियंत्या लक्ष्मी निप्पानीकर यांनी गुरुवारी भेटायला गेलेल्या शेतकऱ्यांना सदर जागा पालिका कार्यक्षेत्रात येत नसल्याचा सांगून तहसीलदार कडे हे प्रकरण पाठवले असल्याचे सांगत हात झटकले आहेत.
वास्तविक पहिला तर मलाई मिळाली तर बेकायदेशीर काम रोखण्यात बेळगावचे अधिकारी असक्षम आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालय. बेळ्ळारी नाल्याच्या पलीकडील कॉम्प्लेक्स आणि इमारतींचा महा पालिका कर वसूल करते पालिकेच्या सीमा अनुसार आणि सी डी पी नुसार हि जागा महा पालिका कार्यक्षेत्रात येते मात्र राजकीय दबावाखाली हे याकडे डोळेझाक केली जात आहे असा आरोप शेतकरी करत आहेत .
बेळगाव live कडे अतिक्रमण फोटो आणि ही जागा महा पालिकेच्या हद्दीत येते हा सि डी पी आहे
( खालील लाल रेषेच्या आत बेळ्ळारी नाला आहे मात्र केवळ राजकीय दबाव पोटी महा पालिका हात झटकत आहे )
सरकारी कायद्यानुसार शेत जमीन एन ए नसताना कंपाउंड बांधून भराव माती टाकत आहेत विलेज अकौंटट केवळ एकदाच नोटीस बजावली आहे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका माजी आमदारच्या सांगण्यावरून दुर्लक्ष करत आहेत असा आरोप ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर यांनी केला आहे. जर हे कंपाउंड बांधून पूर्ण झाले तर पावसात या भागातील बेळ्ळारी नाल्यात जाणारे अडवले जाऊन वडगाव पर्यंतची ५०० एकर जमीन पाण्याखाली जाण्याची भीती आहे असा देखील जुवेकर म्हणाले. आगामी काही दिवसात शेतकरी जर अतिक्रमण रोखले नाहीत तर स्वतः शेतकरी काम अडवतील असा इशारा शेती बचाव समितीने दिला आहे.