कर्नाटकातील हावेरी हून महाराष्ट्रातील सोलापूरला बेकायदेशीर रित्या तांदूळ वाहून नेणाऱ्या एका ट्रक ला निपाणी ग्रामीण पोलिसांनी पकडलं असून त्याच्या जवळील ९० टन तांदूळ आणि ट्रक जप्त करण्यात आली आहे .अन्न भाग्य या सरकारी योजनेतील हे तांदूळ आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे
या प्रकरणी निपाणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे . पोलीस निरीक्षक किशोर भरणी अधिक तपास करत असून निपाणी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे .पोलीस अधिक तपास करत आहेत