हायस्पीड बुलेट ट्रेन चा मसुदा मंजूर होण्याच्या मार्गावर आहे त्यातील मुंबई -चेन्नई मार्गावर फक्त पुणे ,बंगळूर आणि तिरुपती शहरांना स्थान देण्यात आले आहे हा मार्ग बेळगाव वरून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे बेळगाव ला बुलेट ट्रेन स्थानक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
बेळगाव एक प्रमुख केंद्र आहे औधोगिक व त्याहून महत्वाचे म्हणजे सैन्य दल दृष्टीने यासाठी शहरातील प्रमुख संस्था व कॅन्टोन्मेंटच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्याची खरी गरज आहे.
बेळगाव शहरातून मुंबई आणि बेंगळुरू कडे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बुलेट ट्रेन ची सोय आपसूक होत असताना बेळगाव च्या प्रवाशांना ती मिळवून देण्यासाठी आता प्रयत्नांची गरज आहे.
खासदार सुरेश अंगडी आणि प्रभाकर कोरे नेमके काय करतील माहीत नाही सतीश तेंडुलकर, बसवराज जवळी, किरण ठाकूर यांच्या सारख्या लोकांनी आपले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडील वजन वापरून हे काम करून घेणे हेच बेळगाव च्या दृष्टीने फायद्याचे ठरेल.
बुलेट ट्रैन शिवाय पुणे-बेळगांव व बेंगलोर-बेळगांव असि दर-रोज़ एक फ्लाइट सेवा असली पाहिजे.
….बेळगांवकर.