बेंगळुरू च्या परप्पन अग्रहार कारागृहातील गैरकारभाराची डीआयजी डी रूपा यांना माहिती देणाऱ्या त्या तिघा कैद्यांना रविवारी बेळगावच्या हिंडलगा कारागृहात हलवण्यात आले आहे.
व्हीआयपी कैद्यांना विशेष वागणूक देण्यासाठी बेंगळुरू कारागृहातील अधिकाऱ्यांनी ३ कोटी रुपये लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे.
अनंतमूर्ती, बाबू आणि लांगबाबू अशी त्या कैद्यांची नावे बेळगाव live च्या हाती आली आहे.
त्या कैद्यांना प्रचंड मारहाण करण्यात आल्याची माहिती हाती आहे. कारागृहात नेताना त्यांना चालताही येत नव्हते. यावरून डीआयजी रूपा यांची भूमिका खरी ठरण्याची शक्यता आहे.