बेळगाव पोलिसांनी २०१० ला आपली स्वताची नवीन वेबसाईट सुरु केलेली बंगळूरू नंतर बेळगाव पोलिसांचीह दुसरी वेब साईट होती मात्र काही दिवसात ती बंद देखील करण्यात आली होती आता पोलीस आयुक्त झाल्यावर पुन्हा एकदा बेळगाव पोलिसांनी नवीन वेब साईट बनवली आहे लवकरच नवीन बनविलेल्या या वेबसाईट च उद्घाटन केल जाणार आहे . त्याच संकेत स्थळ अस आहे.
http://www.belagavicitypolice.in/
नवीन वेब दिसायला नीट नेटकी असून वर्ड प्रेस वर आधारित बनवली आहे यात प्रत्येक पोलीस स्थानक पोलीस स्थानकाचा फोटो आणि संबधित पोलीस निरीक्षकाचा फोटो आणि फोन नंबर त्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्राचा नकाशे देखील त्यात अपडेट करण्यात आले आहेत.
वेगवेगळ्या प्रकारचे हेल्प लाईन चे फोन नंबर्स नाव देखील या साईट वर टाकण्यात आली आहे नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या बीट सिस्टम चे खास पेज देखील यात तयार केल असून याची देखील संपूर्ण माहिती वेब वर टाकली आहे . महिला सुरक्षा सिनियर सिटीजन बँकिंग सह चोरी या सारखी सामान्य माहिती कलम यांची माहिती देण्यात आली आहे पोलिसांना करायच्या सूचना तक्रारी साठी देखील जागा दिली असून दररोज च्या गुन्हे , बेपत्ता असल्याची तक्रारी ,सापडलेले मृतदेह यांची माहिती असणार आहे .
सगळीकडे वेब सोशल मिडीयाचा दबदबा सुरु असताना बेळगाव पोलिसांनी देखील सोशल मीडियाची दखल घेतली आहे .