Tuesday, December 24, 2024

/

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची हत्त्येची एन आय ए मार्फत चौकशी करा

 belgaum

Bjp prrotest

शरत हत्या प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करा अशी भाजपची मागणी करत  हाताला काळी पट्टी बांधत बेळगाव भाजप ने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन केली.

 

कर्नाटक काँग्रेस सरकारची वाटचाल हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधातील आहे, असा आरोप भाजप करत शरत यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास दल (NIA) यांच्याकडे वर्ग करण्याची मागणी जिल्हाधिकारी जयराम यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते शरत मडीवाळ यांची हत्या झाली आहे. पण,त्याची चौकशी अजून गती घेतली नाही. त्यावरून सरकारचे धोरण हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी याची चौकशी एनआयएकडे देण्यात यावी, अशी मागणी भाजपनी केली आहे. राजेंद्र हरकुनी, किरण जाधव, अनिल बेनके, रवी पाटील, श्रीनिवास बिसनकोप, अनुप काटे राजू टोपपन्नावर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.