सापाच नाव काढल की प्रत्येक जण घाबरतो लहान मोठे सगळ्यांच्या अंगावर काटे येतात मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एक गाव अस आहे की तिथल्या लोकांच्या मनात सापबद्दल आजिबात भीती नाही ! त्या गावाचे लोक अजिबात सापाला घाबरत नाहीत..ढोलगरवाडी अस या गावच नाव असून याच गावातील मामा साहेब लाड विद्यालय या शाळेच्या अभ्यास क्रमातच सापा बद्दल विषय ठेवण्यात आला आहे या शाळेतील विद्यार्थीं सापाबद्दल शिक्षण घेत असतात.लाड शाळेच्याआवारात नाग पंचमी निमित्य यात्रेच आयोजन केलं जातंय आणि उपस्थित सर्वांना सापाबद्दल माहिती देऊन जन जागृती करण्यात येते यावेळी विषारीआणि बिन विषारी असे अनेक जातीचे साप प्रदर्शनाला ठेवण्यात येतात .ढोलगर वाडीतील या शाळेत इयत्ता 5 वी पासून 12 च्या विध्यार्थ्यांना सापाबद्दल माहितीचे धडे गिरवण्यात येतात या शाळेत जवळपास 600 हुन अधिक विद्यार्थी आहेतया शाळेची सुरूवात 1966 साली बाबूराव टक्केकर यानी सापा बद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही शाळा सुरू केली आणि याच गावातील स्वातंत्र्य सैनिक मामा साहेब लाड यांचे नाव दिले . या शाळेचे संस्थापक संचालक बाबूराव टक्केकर गुरुजी बेळगाव live शी बोलताना सांगितले की मी जेंव्हा 40 वर्षा पूर्वी या गावातील खेड्यात नालयात खेकडे पकडत होतो तेंव्हा खेकड्या एवजी साप पकडला आणि त्यानंतर जेंव्हा पाण्यातून बाहेर आल्यावर मला समजल की सापाला हाताळणे सोप आहे त्यानंतर मी सापा बद्दल जनजागृती करण्याचे ठरविले आणि शाळा सुरू केली.आज या शाळेतील सगळे विद्यार्थी सापाबद्दल भय मुक्त आहेत या शिवाय गावातील लोक सापाला घाबरत नाहीत शाळेतील विद्यार्थी आपापल्या घरी जाऊन घरातील मंडळींना भयमुक्त बनवतात त्यामुळे पासून भय मुक्त गाव बनले आहे.या शाळेतील एक शिक्षक टि एस सुतार यांनी बेळगाव live शी दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं की शाळेत विद्यार्थ्यांना दाखला घेतल्यापासूनच कमी वयातच विषारी आणि बिन विषारी सापांची ओळखण्याचे शिकविले जाते सध्या शाळेत 70 हुन अधिक जातीचे साप आहेत. वन्य प्राणी विभाग दिल्लीआणि महाराष्ट्र सरकारच्या वन्य जीव खात्या तर्फे या शाळेला सापा बद्दल जनजागृती करण्या साठी परवानगी दिलेली आहे . आता पर्यंत या शाळेला अनेकानी भेटी दिल्या असून या शाळेच्या सापाना जीवदान दिलेल्या योगदाना बद्दल कौतुक केलं आहे.आता पर्यंत अनेक विदेशी पर्यटक मराठा सेंटरचे जवान अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी या शाळेला भेट दिली आहे. येळ्ळूर येथील सर्प मित्र दंपती लआनंद चिट्टी निरझरा चिट्टी याच मामा साहेब लाड शाळेचे विधयार्थी आहेत.