यावर्षीचा गणेशोत्सव २५ ऑगस्ट २०१७ रोजी आहे, आणि आजतागायत बेळगाव शहर आणि परिसरातील मूर्तिकाराकडे शाडूच्या १०% सुद्धा मुर्त्या तयार नाहीत, आणि ऐन पावसाळ्यात तितक्या मुर्त्या तयार होण्याची शक्यता नाही, म्हणून एकंदर बेळगाव व ग्रामीण भागातील लोकसंख्येचा विचार केल्यास एवढ्या वेळात शाडूच्या मुर्त्या तयार करणे शक्य नाही.
तेव्हा पीओपी च्या मूर्त्याशिवाय पर्याय नाही यासाठी महामंडळ लवकरच न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करणार आहे.
कारण गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाचा पीओपी बंदीचा आदेश हे प्रशासन दाखवून सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांवर केसेस घालण्याची भीती दाखवत आहे.
त्याचप्रमाणे मूर्तिकारांच्या कार्यशाळेत जाऊन तिथले व्हीडिओ शूटिंग घेऊन एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत.
गेल्या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्तिकारांना शेडू पुरविण्याची ग्वाही दिली होती, पण त्याची पूर्तता अजून झाली नाही,
एक तर प्रशासनाने दुसऱ्या राज्यातून शाडूच्या मूर्ती उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा पीओपी मूर्तीना आडकाठी आणू नये.कारण या ठिकाणी वाहत्या पाण्यात विसर्जन करत नाहीत.
यासाठी महामंडळाचे अध्यक्ष संभाजी पाटील व सरचिटणीस महादेव पाटील यांच्या माध्यमातून लवकरच एक जनहित याचिका दाखल करणार आहेत अशी माहिती बेळगाव live कडे मिळाली आहे
न्यूज सोर्स- महादेव पाटील
nyayalayat aata jaun kay upyog etke divas kay kele mhane he lok