Monday, November 18, 2024

/

विजेच्या धक्क्याने कावळेवाडीच्या शेतकऱ्याच्या मृत्यू

 belgaum

रोपण लावायला गेलेल्या शेतकऱ्यास तुटलेल्या वायरचा स्पर्श झाल्याने लागलेल्या विजेच्या धक्क्याने एका शेतकऱ्याचा जागीच मृत्य झाल्याची घटना शनिवारी दुपारी नावगे शेतवाडीत घडली आहे
उत्तम परशराम कारवेकर वय 38 वर्ष रा कावळेवाडी अस या मयत शेतकऱ्याच नाव आहे. शनिवारी सकाळी मयत आपल्या पत्नी सह शेतात भाताची लावणी करायला गेलेला दुपारी तो पाण्याची मीटर सुरू करायला गेला असता खांबावरून तुटलेल्या वायरचा स्पर्श होऊन शॉक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात पत्नी दोन मुलं असा परिवार आहे.

Farmer deathया घटनेने पुन्हा एकदा शेतात शेतकरी असुरक्षित आहे हे सिद्ध झाले आहे.

मयत शेतकऱ्याच्या परिवारास आर्थिक मदत केली जावी अशी मागणी करण्यात येत आहे जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे आणि ए पी एम सी अध्यक्ष निंगप्पा मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.