योगा ही भारतीय प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. शरीर आणि डोकं या दोघांच्या एकतेचं प्रतीक आहे. मनुष्य आणि निसर्ग या दोघांतल सामंजस्य म्हणजे योगा होय .आरोग्य सहं विचार संयम आणि स्फूर्ती देणार साधन योग आहे याचा लाभ युवकांनी घ्यावा असे आवाहन वकील अनिल बेनके यांनी व्यक्त केलं आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच औचित्य साधून जालगार गल्लीतील मारुती मंदिरात योगा स्पर्धेच उदघाटन केल्यावर ते बोलत होते यावेळी चव्हाट गल्ली येथील पंच महादेवराव मोहिते, वकील किसन येळ्ळूरकर,लीना टोपन्नावर,विक्रमसिंह राजपुरोहित आणि इतर मंडळी उपस्थित होती
या स्पर्धेत 120हुन अधिक बेळगाव सह उत्तर कर्नाटकतील योगा खेळाडूनी सहभाग घेतला होता सदर स्पर्धा अडव्होकेट अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आली होती मुरली प्रभू राजू भातकांडे आदींनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले